गेल्या. ........
गेल्या. ........
सिंहपुच्छ लगागा लगागा लगागा लगागा लगागा गेल्या...
किती सांजवेळा दुपारीच होऊन गेल्या.... तशा प्रेमिका एकट्याला दुरावून गेल्या!!!
कळ्या त्या हसाव्या फुलोनी पहाटे पहाटे .....
सकाळी पहाता मिटाव्या ...दुखावून गेल्या !!!
मनी आस मोठी जलाची असे चातकाच्या ....
नको त्या ठिकाणी झरी धुंद बरसून गेल्या .....!!!
उन्हाच्या झळा लागती मोकळ्या रानमाळी....
वडाखालच्या सावल्या फार तापून गेल्या!!!
किती गोपिका कृष्ण तो गोकुळी नाचवितसे....
सुदाम्यास का एकट्यालाच ठेवून गेल्या !!!!
किती अमृताचे गडू पाजले देवकांना....
झरा राहुच्या त्या तनालाच छाटून गेल्या !!!
मला वाटले तेज माझ्याच डोळ्यात आहे.....
झळा भास्कराच्या नजर ही दिपावून गेल्या !!!!
