STORYMIRROR

Kalpana Deshmukh

Inspirational

4  

Kalpana Deshmukh

Inspirational

वीर सावरकर

वीर सावरकर

1 min
229

भगूर गावी जन्मले

बाल वीर सावरकर

मित्र मेळावा स्थापना

धार तयांची वक्तृत्वावर ।।


अनिष्ट रूढी, परंपरा

कधी न दिला थारा

अस्पृश्यता,वर्णभेद नष्ट

सामूहिक विवाहा दिला नारा ।।


धगधगत्या या अग्निकुंडात

जहाल विचारांची झाली पेरणी

धारदार पात्यासम झळकली

काव्य गीतातून तयांची लेखणी ।।


निद्रिस्त समाजास जागृत करण्या

स्वातंत्र्यसमर ग्रंथ लिहिला

शब्दांच्या अचूक वार विचारांनी

जहाल क्रांतिकारक नसानसात भिनला ।।


काथ्याकुटूनी तेलघाणा चालवी

कारावासातही स्फूर्ती गीत रचले

अंदमानातील काळ्या पाण्यानेही

या धैर्य मुर्तीचे गौरवगीत ऐकले ।।


स्वातंत्र्य लढ्यातील आव्हानांची

ऐसी निरखून गुंफली माळ

तावूनसुलाखून मोती झळकले

भारतमातेस रक्षण्या सज्ज हा बाळ ।।


आकाशातील दैदिप्यमान तारा

या महापुरुषांचे थोर देशकार्य

अभिमानाने सुमने उधळावी

ईश्वरानेही पाहावा हा क्रांतीसूर्य ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational