वीर बलिदानी
वीर बलिदानी
शूर सैनिक प्राणपणाने
रक्षण देशाचे करतात
स्वातंत्र्यदिनी कृतज्ञतेने
जन संस्मरण करतात (१)
वादळ वारा बर्फाचा मारा
नाही मागे कधी हटणार
असो मार्ग बिकट चढाचा
रक्षणार्थ नित्य लढणार (२)
नातीगोती संसारमायेची
सोडूनीया सीमेवरी जाती
कर्तव्याची जाणीव रक्तात
युद्धभूमीचे आव्हान घेती (३)
सुखी विलासी जीवन नको
थरार पराक्रम आवडे
आयुष्याचे सार्थक तयांना
कर्तव्यपूर्तीमधेच घडे (४)
भारताचे सुपुत्र करती
सीमेवरी रक्षण देशाचे
कार्य तयांचे महान आहे
कोटी प्रणाम भारतीयांचे (५)
