विद्याधन
विद्याधन


कर रात्रीचा दिवस
मनो मन कर कष्ट
कर आज्ञाचे पालन
विद्याधन सर्वश्रेष्ट ।।
नाही जात कधी चोरी
घेत नाही कुणी वाटा
नाही लागणार किड
विद्याधन मोठा साठा ।।
विद्या हे ज्ञान भंडार
मिळे जगी मान पान
घेरे आकाशी भरारी
मिळवून श्रेष्ट स्थान ।।
विद्या हा ज्ञानाचा मार्ग
बळ मिळते पंखाला
देते उभारी मनाला
गाठो यश शिखराला ।।
नाही जाणार ते वाया
विद्याधन खरी शान
कर शब्द शब्द जमा
त्यात मिळे सारा मान ।।