वाटचाल
वाटचाल
रस्ता खडतर असला तरी
प्रवास थाबंवू नको
पूढेच चालत रहा
मागे फिरू नको
चालू ठेव वाटचाल तुझे ध्येय सोडू नको
अनेक अडचणी येतील
रस्ते अनेक असतील
ओळख तुझी वाट कोणती
मागे पडू नको
चालू ठेव वाटचाल तुझे ध्येय सोडू नको
अडथळे असतील वाटेवरती
शर्यत सुरूच ठेव
अंतिम रेषा गाठण्यासाठी
कमी कुठेच पडू नको
चालू ठेव वाटचाल तुझे ध्येय सोडू नको
प्रलोभनांचा पाऊस पडेल
देवू करतील मोठी लाच
टेबलाखालुन देणार्यांची
गय करूच नको
चालू ठेव वाटचाल तुझे ध्येय सोडू नको
