वाट
वाट
प्रत्येक वळणावर चालताना
वाट ही सोबत माझ्या वळते
माझा संघर्ष चालूच राहतो
वाट न थाबंता पूढे पळते
किती असती खाचखळगे
उसंत तिजला नसते
जखमेवर लावून मुलामा
पुन्हा कार्यरत दिसते
आपल परकं काहीच नाही
सोबत घेऊन फिरते
तिच्या सोबतीत जिवन
कुठल्या कुठे सरते
नाही भावनांचा उहापोह
नाही कोणतीच शंका
कधीच मिरवत नाही
अस्तित्वाचा डंका
वाट साधी भोळी पहा
नसे कोणताच तोरा
सदैव कामी पडूनही
तिचा पेपर कोरा
