वासरु
वासरु
एका वासराची माय ती
हंबरडा फोडीत होती
वासरु हरवले माझे म्हणून
चोहीकडे शोधीत होती
चाळ बांधली जणू पायी
अशी रानोमाळी भटकत
वासरु माझ लहान आहे
पाय त्याचे कापतात लटपट
गोठ्यातील वासरु माझ
कसे काय चोरीला गेल
कोणत्या त्या हायवानं
माझ वासरु पळवून नेल
जीव रडतोय त्या आईचा
कधी वासरु पान्हा चाटतोय
वासराच्या माये अभावी
आईचा दुधाचा पान्हा आटतोय
कुठे असेल वासरु माझ
ते तिथे सुखरुप रहावे
माझा हंबरडा ऐकून त्याने
आई म्हणून माझ्याकडे पहावे
