पाताळयंत्री
पाताळयंत्री
वनी बेधुंद, सकल शिरतात.
कुशीत रडून ,पटल फिरतात.
हृदय तोडले, माझे कचकन.
सांगून मला, वार जिरतात.
आता नदीत, डुंबलोय मी.
तहानलेले, भार उरतात.
माझी चालच, बिनधास्त यार.
अमानुष मी नि, सभा भरतात.
नसे मुक्काम, सरळ रस्त्यास.
ते दिशादर्श, फलक धरतात .
खुलेआम ते, हमामी उभे.
त्यांना बघून , देव डरतात.
लोखंडी ती, पाठ पाहते.
येऊन सुरे, तिथे चरतात.
रक्तरंगीत, हृदयी माझ्या.
विडी ओढीत, बेत ठरतात...
तळाला दगड, भिजून बुडतो.
धोंड माथ्यास, कधी तरतात.
