STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Tragedy

3  

swati Balurkar " sakhi "

Tragedy

परतून पाहताना

परतून पाहताना

1 min
239

जगता जगता कळालेच नाही

काय मी सोडून आले,

चालताना पुढे पुढेच मी

कितीतरी पाश हे तोडून आले!

हर क्षणी आताशा खंत ही करतेच आहे 

वाटतेय जणू जीवनाचा अंत मी करतेच आहे.

काय गवसले , काय कमवले

काय मिळाले अन काय गमवले?

या क्षणे कळेना मला का आजच

हिशोब आयुष्याचा हा मी मांडते आहे

मूकतेने सोसल्या सार्‍या व्यथा आजवर

हरवलेल्या सुखासाठी जीवनाशी भांडते आहे

कुणीच नको आहे आता मजला

वाटते आहे, शेवटचा जुगारच हा सजला!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy