तिच्या उरीचं काहूर...
तिच्या उरीचं काहूर...
उषा असे आयुष्याची
ऐन कोवळी उमर
खूलताना तिची कळी
एक थबके प्रहर
जीव तुटे तिळतिळ
तिचा खुंटला बहर
रात्री भयाण जाहल्या
रितं राहील उदर
कलुषित झाली दृष्टी
अन् कोमेजली पोर
काळ्याकुट्ट ढगांमध्ये
झाकोळली चंद्रकोर
तिच्या मनीही खूलतो
प्रीती प्रेमाचा अंकुर
रातराणी गंधाळण्या
होई अंगणी आतुर
जशी आहेस प्रिये तू
माझ्या जीवनाचा सूर
आता क्षमू दे सखये
तुझ्या उरीचं काहूर

