शब्द मुका जाहला
शब्द मुका जाहला
पानोपानी लिहिल्या ज्या कथा
वाचल्या गेल्या तुझ्या त्या व्यथा
जाणुनी शब्दातील त्या भावना
भावुक होताच सारेच बधीरपणा
अंतर तसं कमीच होते पार इथे
भय सुखाचे साधते हे मन कुठे
विचार कंपित स्वर थिजले जिथे
शब्द विना ही कळावं का अपेक्षिते
पाहीले वाचले शब्द तेही न्यायचे
निशब्द केले नेहमीच अन्यायाने
भाव कोवळा ना रुजला कधीही
विचार स्वतंत्र ना जगला अस्तित्वाने
शब्दास मुके होतानाही आज पाहिले
मुक्या नजरेतील सल ती विचारतेय
शहाण्यची जत्रा मूढ मतीस का गुंगली
वाचले जे शब्द शहाणे पण फोल ठरले
निशब्द भावनाचा कुंचला घेत हाती
नभाच्या दिशेने असता भिरकावला
मेघाच्या काळजास गहिरा घाव दिला
अन मुक्या आसवांत नभ बरसला
शब्दाविण ना कळले कळेल कधी
रोजची रात्र रोजचा दिनक्रम इथे
भेगळल्या भुमिपरी दीन ती सति
नजरेत प्रश्नाचा खेळ मांडला जिथे
भाव जगण्याचा नजरेत भावला
तोच मरणाच्या दिशेला वळला
शब्द शब्दात लिहिला होता तो
भाव भोळा अबोल मुका जाहला
