STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance Tragedy

3  

Ajinkya Guldagad

Romance Tragedy

तुज बघताच असा...

तुज बघताच असा...

1 min
282

तुज बघताच असा हा....जो डाव चुकला होता....

भुलली न भूल अजूनही....असा दंश जाहला होता...

तुला बघताच असा हा...

मावळत्या सांजवेळी...जव समीप तू आली....

आरश्यासम मी स्तब्ध ...निचरून राहिला होता....

तुज बघताच असा हा....जो डाव चुकला होता...

भुलली न भूल अजूनही...असा दंश जाहला होता....

भुरळलो मी क्षणभर....स्मृतिभंश जसा झाला....

कमरेच्या त्या तिळाचा ...समाचार घेतला होता....

तुज बघताच असा हा....जो डाव चुकला होता....

भुलली न भूल अजूनही....असा दंश जाहला होता....

लाडिक ती नजर....अबोल होते डोळे....

मिटवताना पापण्या तुझ्या....तो घाव झाला होता....

तुज बघताच असा हा...जो डाव चुकला होता....

भुलली न भूल अजूनही...असा दंश जाहला होता...

थरथरता स्पर्श तुझा...जव ओठांना झाला....

इशाऱ्यांत मारण्याचा....जणू बेत चालला होता....

तुज बघताच असा हा....जो डाव चुकला होता....

भुलली न भूल अजूनही...असा दंश जाहला होता....

रुसला तो चंद्र.....तुझ्या कोमल सौंदर्यतेला....

तारकांवीन असा त्याने....एक चंद्र पहिला होता...

तुज बघताच असा हा....जो डाव चुकला होता....

भुलली न भूल अजूनही....असा दंश जाहला होता....

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance