STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

आम्ही कुरवाळतो इतिहास जुना

आम्ही कुरवाळतो इतिहास जुना

1 min
228

जिच्यावर आपण मरायचं

तिनं मात्र सोडून जायचं

आयुष्य आपलं करून भयाण

तिनं दुसरं घरटं बांधायचं?


तिनं व्हावं बिनधास्त स्वार्थी, संधीसाधू

घरच्याच कारण पुढं करून मोकळं व्हायच 

तिनं झालं गेलं गंगेला मिळालं म्हणायचं

पाहिलं प्रेम म्हणत-म्हणत कुढत बसायचं


ती परिस्थितीशी जुळवून घेते

आमची मात्र भीष्मप्रतिज्ञा

ती लिहते तिची यशस्वी गाथा 

आम्ही मात्र विराणी गात अधोगतीला


ती पदरी पडले पावन झाले म्हणते

भूतकाळाला, प्रेमाला जमिनीत गाडून

आम्ही कुरवाळतो इतिहास जुना

समाधीस्थळावर फुलं वाहून जाशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy