STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy

बस्स झाला तुमचा तमाशा

बस्स झाला तुमचा तमाशा

1 min
266

असे कसे रे ढोंगी झाँसाराम निपजले

जणू बेशरम, गाजर गवत माजले

तो राजहंस एक देशोधडीला

ते मङयावरचे लोणी खाणारे


महागाई, बेकारी भ्रष्टाचार, कोरोना

थय- थय नाचतोय छाताडावर

अन्नदाता, बेरोजगार सारे रस्त्यावर

मायबाप सरकार मश्गुल सत्तासंघर्षांत


काम - धाम नाही, अंगभर कपडा ना

डोईवर छत, जगतो जनावरागत

लोकशाहीचा राजा सदैव भिक्षांदेही

पढाई दवाई शिक्षा, जल जमीन कि लढाई


आरे जनाची नसेल कदाचित

मनाची तरी थोडी धरा आता

बस्स झाला तुमचा तमाशा

पेकाटात पडेल लाथ ध्यानी ठेवा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy