जबाबदारीच्या ओझ्याखाली....
जबाबदारीच्या ओझ्याखाली....
जबाबदारीच्या ओझ्याखाली
जो असतो ना तो कधी थकत नाही,
ना कधी खचत नाही,
मोठा मात्र लवकर होतो....
निरनिराळ्या अनुभवांच्या
ठोकरा खाऊन.
अपेक्षा कुणाकडून ठेवत नाही,
मदत करणाऱ्याला तो कधीच विसरतं नाही.
जाणूनबुजून कधीचं कोणाला दुखवत नाही.
नेहमी पहाडासारखा उभा राहून इतरांना आसरा देतो.
जबाबदारीच्या ओझ्याखाली.....
तो कधीचं दबत नाही.
परिस्थितीशी हार पत्करून कधीचं
आत्महत्या करत नाही.
ज्याला खरंच जबाबदारीची जाणीव असते,
तो कधीचं असं टोकाचं पाऊल उचलत नाही.
