विलंब
विलंब
विरहाचं क्षण थिजले
विलंब तुझा जीवघेणा
प्रवास जिव्हारी जाहला
थांबव आतातरी प्रतारणा
संथ लयीत गातो निसर्ग
भय इथले संपत नाही
जीवनाचा अथक प्रयास
पाय तरी कंपित नाही
आशेचा हवाला देत तरी
कितीदा आस ही जगावी
क्षण क्षण दुर जात तरी
आस मनी का बाळगावी
जीवा तुटू पाहे ती आस
तरी विलंब का मरणास
जीव निघून जाईल वाटे
तरी जगते ती एक आस
ना जाणो कोणती ती
आस मनी ही विसावते
जाणते मनी सत्याला
जीवन वाट ती चालते
