Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Inspirational

आजा मेला, पंजा मेला

आजा मेला, पंजा मेला

1 min
877


बाजार फुटला, पालं उठली

मनात दाटली गडद छाया

पावलं निघाली घरच्या ओढीनं

हरीण धावे जशी पाडसासाठी


दीडदमडीचा भाव मिळाला

खर्च जाता काय उरलं कप्पाळ ?

वेदनेचा ठाव ना जगण्याला भाव

जनावरागत जीणं पाचवीला पुजलेलं


पिकतं ते विकतं कवडीमोल

चोर - उचक्के नाक्या नाक्यावर

गिधाड टपलीत सावज टिपण्यास

जगणं - मरण नियतीच्या भरवशावर


आवंदाही त्यानं तोंड काळ केलं

आला तेव्हा छाताडावर नाचला

कार बाबा असा कोपतो ?

सरकार, व्यापारी, आता तुही


आजा मेला, पंजा मेला, बाप

मसनात गेलो रे आता मीही

पोरीचं लगीन पोराचं शिक्षण

कसं फेडावं सावकाराचं रीन ?


Rate this content
Log in