STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy

मुली...???

मुली...???

1 min
194

मुली म्हणजे चिमण्या 

सतत चिव-चिव करणाऱ्या

पण त्यांना स्वतःचे पंख नसतात.

सासर असतं, माहेर असतं त्यांना 

पण स्वतःच असं हक्काच घर नसतं .

माहेराला परक्याच धन 

आहे असं संबोधल जात,

तर सासरी परक्या 

घरातून आली असं ऐकावं लागत.

हे देवा आता तूच सांग.....!!!

नक्की कोणासाठी जन्माला 

घातलस आम्हाला...?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy