जमलं देवा तुला....
जमलं देवा तुला....
जमलं बघ तुलाच देवा.. भातुलकीचा खेळ करणं...
फक्त एका मरणासाठी..आयुष्यभर खेळवणं....
तुझ्यापासून आलो देवा.. वाईट बघ वाटलं....
जन्मताच डोळ्यांत माझ्या...पाणी बघ साठलं....
तुझ्या अंशाला देवा आता.....नाव त्यांनी दिल....
माझं माझं करून देवा... मला गुंफून टाकलं....
देवा.!पण खरंच आता...हसू रुसायाला लागलं....
जाणिवेच्या ओझ्याखाली...गुदमरायला लागलं....
अरे अस वाऱ्यावर सोडून...किती दिवस लपशील....
मरणाऱ्याला मरू तरी दे....किती असा जपशील....
श्रीमंत गरीब देवा कशी...शर्यत तू लावली....?
प्रेतासाठी रडतात लोक....बघून बघ सावली .....!
सोनं ,नाणं, नाव,पैसा...ह्यातच जिंदगी भासवली....
श्रीमंतीच्या उंचीवर नेहमी...तू माणुसकीच भाजवली....
जाणीव मात्र देतो देवा....श्रीमंत खरा तूच आहे...
कमावलेल्या साऱ्यात शेवटी...वारसाला कोण आहे...?
जन्ममरणाचे भोग सांगून ...किती रे तू छळतोस...?
विखुरला जो आयुष्यातुन...त्यालाच मळ मळ मळतोस...!
असतील रे भोग आमुचे....मान्य आम्ही करतो....
एक एक दिवस तुझा....मरून मरून बघ जगतो....
पण सांग ना रे देवा खरंच....कधी मला दिसशील....?
सांडलेला बघून असा मी....कधी रे तू हसशील....?
मजेत आहे बघ देवा तू....ही शर्यत बघताना....!
पण, चुकू नको हा हिशोब माझ्या...कर्माचा टिपताना....
चुकता करल बघ व्याजासहित...थोडा मला वेळ दे...
धीर ठेव देवा फक्त.... सोचल असाच काळ दे....!💐🙏
