स्त्री...
स्त्री...
कोंडून श्वास तीचे ती गाते गीत स्वातंत्र्याचे
लपवूनी भाव मनीचे जगते ती रोजच येथे
भावते तीस इंद्रधनुचे रंगोत्सव तरी होलिका ती या संसारी
त्यागाची ती ज्वलंत मुर्ती, पुजती तीज ही दुनिया सारी
अस्तित्व तिचे सवयीचं जरी आई मुलगी पत्नी असे तरी
कर्माने ती गुलामच तुझी रे ही कल्पनाच तीज छळी भारी
रंगांची मुक्त उधळण असे ,आसमंतात रंग भरला जरी
आयुष्याची होळी करूनी ही ,संसारी ती नसे तीच खरी
