वारी ऑनलाईन शिक्षणाची
वारी ऑनलाईन शिक्षणाची
माफ करा मज पांडुरंगा,
कधी केली नाही वारी,
सदा पुजून ज्ञानयज्ञ,
शाळा मानली पंढरी //१//
कुंभारापरी घडवी सुंदर,
ओल्या मातीचा गोळा,
अजाण पाखरांचा थवा,
फुलवी आनंदाचा मळा //२//
ठेवतो मी सदा फुलवत,
विद्यार्थ्यांची ज्ञान लालसा,
भविष्याचे प्रश्न सोडवत,
जपतो नामाचा चालीसा //३//
फळा आणि खडू,
जीवनाचे असे सार,
पण, आता वाही सदा
ऑनलाईन शिक्षणाचा भार //४//
मृदुंगाचा होता गजर,
फुले वारकऱ्यांचा मळा,
तशी घणघणता घंटा,
बाल गोपाळ होती गोळा //५//
