वादळी पावसात...
वादळी पावसात...


मनाला या आधीच भारी
पावसात भिजायची हौस
छत्री नसतानाच यायचा
नेमका वादळी पाऊस
पहिलं भिजणं असंच व्हायचं
भिजता भिजता विसरून जायचं
काळ वेळेचं भानच नसायचं
दरवर्षी हे ठरलेलंच असायचं
भिजत भिजत मग टपरी गाठावी
वाटायचं तिथे "ती" ही भेटावी
कपाला बशीची अशी साथ असावी
चहा संपण्याआधी बसच सुटावी
ओल्या पावसातही असं स्वप्न पडे
चहासोबत खुणावत गरमागरम वडे
घोटासोबत स्वप्न पोटातच मग दडे
पुरता वाळलो तरीही मन मागे-पुढे
मी आणि वादळी पाऊस दोस्त पक्के
दोघांची सोबतही होतीच जरा हटके
कधी अकस्मात तोही द्यायचाच धक्के
वर्षात एखादी भेट व्हायची... शंभर टक्के