"वाढदिवस"
"वाढदिवस"
आज तुझा वाढदिवस
मजेत घालून सारा दिवस
अंगावरती पांंघर किरणं
अंगभर पसर चांदणं
दहा दिशांचे जुंंपून अश्व
रथात बसून पहा विश्व
आभाळभर लाव दिवे
फुुलात भर रंग नवे
शब्दामध्ये प्राण भर
मृदुुंगावर ताल धरू
सात सुरांच्या पुरात नहान
आनंदाचे गाणे गायले
मजेेत घालवू सारा दिवस
आज तुझा वाढदिवस!!!
