ऊपवास
ऊपवास
मनात एक दिवस आला विचार हा खास...
करून पहावाच म्हणलं निर्जळी उपवास...
नाश्त्याकडे निग्रहाने ठरवून दुर्लक्ष हो केलं...
पोटातल्या भुकेने मात्र जस बंडच पुकारल...
भुकेमुळे आमच कशातच लक्ष्य लागत नव्हते...
पत्नीने मात्र समोर आमच्या पोहे खाल्ले होते...
पोहे खावे आम्ही असा करतच होती ती हट्ट...
आमचाही होता ना उपवासाचा विचार फिट्ट...
पत्नीला वाटलं तिचीच काही चूक झाली...
उपवासाची गोष्ट आम्ही मुद्दाम लपवली...
राग मग जणू हा आमचा कमी करण्यास...
आखला तिने काही जेवणाचा मेनू खास...
स्वयंपाक घरातून येतच होता छान सुगंध...
होऊ लागल आमचंही मन नकळत बेधुंद...
सांगा वर्णु कसा तो अवघड असे प्रसंग...
बांधलाच पुन्हा आम्ही उपवासाचा चंग...
रात्रीपर्यंत पोटाने कसाबसाच तग धरला...
जेवणाने रात्रीच्या आमचा संयम सुटला...
पोटाने आमच्या अचानक उठाव केला...
आम्हीही जेवणावर यथेश्च ताव मारला...
अशी झाली आमच्या निश्चयाची सुंदर फजिती...
पोहोचलीच सर्वदूर आमच्या उपासाची किर्ती...
बायकोची झाली ऐकून हसताना पुरेवाट...
ठरवलं नाही घालायचा उपवासाचा घाट...
