STORYMIRROR

वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )

Abstract Inspirational

3  

वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )

Abstract Inspirational

जात्यावरच्या ओव्या..!!

जात्यावरच्या ओव्या..!!

1 min
204

पहिली माझी ओवी गं

राजमाता जिजाऊला

मार्ग दाखवून शिबबाला

जाणता राजा घडवला


दुसरी माझी ओवी गं

सत्यवानाच्या सावित्रीला

अडवून वाटेत यमराजाला

सत्यवान परत मिळवला 


तिसरी माझी ओवी गं

ज्ञानज्योती सावित्रीमाईला 

विरोध तीने सहन करूनी

स्त्री-शिक्षणाचा मंत्र दिधला 


चौथी माझी ओवी गं

विघ्नहर्त्या गणरायाला

विघ्नहरण करतो नित्य

आधार त्याचाच जीवनाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract