STORYMIRROR

वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )

Action Inspirational

3  

वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )

Action Inspirational

नरवीर तानाजी

नरवीर तानाजी

1 min
192

१६२६ ला गोडवलीत नरसिंह जन्मला

काळोजी मालुसरेंचा अभिमान ठरला

सेनापती स्वराज्याच्या सेनेचा शोभला

सवंगडी त्यास शिवरायांसारखा भेटला


स्वराज्यस्थापनेत राजांना सहाय्य केले

गोडवली गावातच बालपण त्याचे गेले

डोंगरदऱ्यांना त्याने जवळूनच जाणले

वडीलांच्या मृत्युचे दु:ख त्याने साहीले


शेलारमामांकडे ऊंबरठला प्रयाण केले

महाराजांनी दंगलग्रस्तांचे काम सोपवले

तानाजीने होते ते कसोशीने पार पाडले

उमरठवासीही स्वराज्यकार्यात सामावले


फेब्रुवारी १६७० ला मोठी चकमक झाली

ऊदयभान आणी तानाजीची लढाई झाली

किल्ल्यावर जाण्यास घोरपड कामी आली

मावळे अन् पहारेकऱ्यांत धुमश्चक्री उडाली


ऊदयभानने वार तानाजीच्या हातावर केला

तुटलेल्या हातावरती बांधला तानाजीने शेला

अखेरपर्यंत तानाजी कोंढाण्यासाठीच लढला

४ फेब्रुवारी१६७०ला गड आला पण सिंह गेला

=============================


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action