जाग रण चंडिके
जाग रण चंडिके
वेळ आली नारीशक्ती जागृतीची
सज्ज हो तू प्रतिकाराला
नव्हती कधीच तू अबला
आठव तुझ्यातील नारीशक्तीला
फोड वाचा अन्यायाला
अधमांना दे कर्माचे फळ
होऊनी रणचंडिका तूची
दाखव तयांना मनगटाचे बळ
आठव काळ, मर्दानी लक्ष्मीबाईंचा
शौर्य, धैर्य अन् पराक्रमाचा
घेऊनी हाती, कर वार शस्त्राने
राक्षसी दानवी त्या क्रूर कर्माचा
मात करण्या संकटावरी
स्व-रक्षणाचे घे तू धडे
नराधमांचा अंत करण्या
तुझे बळ कधी कमी न पडे
जाण्या सामोरे नराधमांच्या
धैर्याचे ठेव सदा हत्यार
नकोच ती, कधी म्यानात
आत्मविश्वासाची तळपती तलवार
आदी काळातील तुझीच रुपे
आठव दुर्गा, काली, अंबिके
करण्या दुष्टांचा संहार
जागी हो, तू रणचंडिके
