हसणं तुझं (पंचाक्षरी)
हसणं तुझं (पंचाक्षरी)
हसणं तुझं ,
घायाळ करी..!!
पाहता तुला ,
धडकी उरी..!!
वाहून गेली,
खूप आसवं
सांग सजनी
कसं जगावं ??
मधाळ हसू
जीवच घेई
बघून तुला
हुरुप येई
जग दोघांचं
आहे सुंदर
नकोच त्यात
अश्रूंची भर

