हद्दपार ( मुक्तछंद )
हद्दपार ( मुक्तछंद )
वाईट त्या आठवणींना
हद्दपार करायचं होत
मनामधल्या वेशींना
मात्र हे मान्य नव्हतं
तुला आयुष्यातून
काढून टाकायचं होत
मनातल्या भावनांना
मात्र हे शक्यच नव्हतं
तुला गुपीत ह्रदयाचं
मला सांगायचं होतं
पण तुला ते ऐकणं,
मात्र शक्यचं नव्हतं
आठवणी मला त्या
सर्व विसरायचं होत
आठवणींना हट्टानेच
पुन्हा पुन्हा यायचं होतं

