श्रावण आला
श्रावण आला
घेऊनी हर्ष
श्रावण आला
मनास माझ्या
आनंद झाला
नागपंचमी
सण पहिला
पुजू नागाला
सर्व महिला
स्वातंत्र्यदिनी
वीरांना स्मरु
देशभक्तांना
वंदन करू
रक्षाबंधन
पवित्र सण
भाऊ-बहिण
भेटीचा क्षण
गोपाळकाला
सुखसोहळा
श्रावणमास
लावितो लळा
