वादळवाट
वादळवाट
आलं कुठूनी वादळ ??
कठीणचं झाली वाट..!!
शिणलेल्या रात्रीची ,
होईल का हो पहाट ??
जीव जडला होता ,
स्वत:पेक्षाही जास्त..!!
वादळवाटेवर चालून ,
झाले आता परास्त..!!
थकले रोज भांडून ,
त्याच कठीण प्रश्नांशी..!!
अश्रूंच्या पुरात नित्य ,
रात्री भिजतेय उशी..!!
येईल का कुठून ??
किरण आशेचा..!!
कसा सांगू कोणा..??
दाह या वेदनेचा..!!
खूप दु:खी असूनही,
हसूनचं जगावं लागतं..!!
वादळवाटेवरती शेवटी,
घरं शोधावचं लागतं..!!

