उकडीचे मोदक
उकडीचे मोदक
सुखकर्ता गजानन
आहे माझ्या आवडीचा
बनवण्यासाठी खाऊ
प्रश्न नाही सवडीचा
आज बनवले होते
उकडीचे मी मोदक
रुप बाप्पांचं सुंदर
वाटे खूपचं मोहक
ओलं खोबरं किसलं
त्याला तूपात भाजलं
रंग तांबूस होताचं
त्यात गुळाला टाकलं
वेलचीबाईंचा थाट
होता सर्वांनी पाहिला
खोबऱ्यात टाकताचं
गंध छान पसरला
तांदळाच्या उकडीत
मग सारण भरलं
कळीदार मोदकांनी
मनं माझं सुखावलं
मोदकांना वाफवले
केशराने सजवले
माझ्या निस्वार्थ भक्तीने
बाप्पा प्रसन्न जाहले
