सावित्रीला काव्यांजली ( अष्टाक्षरी )
सावित्रीला काव्यांजली ( अष्टाक्षरी )
जन्म झाला सावित्रीचा
अठराव्या शतकात
झुगारल्या जुन्या रूढी
फुलेंसह ठसक्यात
भिडेवाड्यामध्ये झाला
नव्या क्रांतीचा आरंभ
शिकवून महिलांना
केला युद्धाचा प्रारंभ
समाजकंटक होते
उभे विरूद्ध कार्यात
केले प्रयत्न अनेक
शेण दगड मार्गात
तरी नव्हती बधली
अबलांची ज्ञानज्योती
प्लेग रोगाशी लढली
मावळली प्राणज्योती
आम्ही सावित्रीच्या लेकी
तिला आदर्श मानतो
पदपथावर तीच्या
आम्ही गर्वाने चालतो
काव्यफुले सावित्रीची
होती सर्वांना भावली
आज वाहते शब्दांनी
सावित्रीला काव्यांजली
