प्रीतीचा विंचू ( मुक्तछंद )
प्रीतीचा विंचू ( मुक्तछंद )
प्रेम बाण तुझा वर्मी माझ्या लागला
सख्या मनमोराचा पिसारा फुलला
तुझा इशाऱ्यांनी जीव घायाळ झाला
सख्या मजला प्रीतीचा विंचू चावला
तुझ्या स्थानिध्याने जीव हा आनंदला
कळलं आता कठीण प्रेमाचा मामला
सख्या गुंतले माझे मन अलवार तुझ्यात
वाटते मजला हवीहवीशी तुझीच सोबत
तुझ्या विरहाने आता मन माझे कोमेजते
तुझ्यासवेच सख्या प्रेमगीत गावेसे वाटते
तव स्पर्शाने सख्या जादू अशी काही होते
बघना वेडे मन हे माझे उगाच मग बावरते
तुझ्या आठवणीत रमण्यास मज आवडते
दिवसाही सख्या स्वप्नं तुझेच आता पाहते
प्रेम आपले जसे इंद्रधनूपरीच मज भासते
क्षणोक्षणी सख्या फक्त तुलाच मी स्मरते
तुझ्या सहवासाची धुंदी मदहोशच करते
सख्या तुझं निरागस प्रेमं मनाला भावते
तुझी वाट पाहण्यात जीव माझा गुंतला
सख्या बघ कसा प्रेमांकुर मनी रूजला

