STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Comedy

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Comedy

लग्नात विघ्न

लग्नात विघ्न

1 min
286

गुडघ्याला बांधून बाशिंग तयार आहे

मी चढायला बोहल्यावर

मनोमनी करतोय विचार आई बाबा 

आता तरी माझ्या लग्नाचा घ्या ना हो मनावर


आला अखेर तो दिवस 

झाली बोलणे लग्नाची सुरु 

माझ्या हृदयाची गिटार लागली वाजू 

तू रूरू तू रूरू तूरू रूरू


पटली मग एक मुलगी भारी 

चालू झाली लग्नाची तयारी

होन्यास नवरा झालो मी अधीर

आले हे कोरोना चे वादळ मूर्ख कुठले बधिर


झाले दळणवळण बंद

लागले लाॅकडाऊन 

चार लोकांत लावायचे म्हणे लग्न गुपचूप

शोधले मग एक गोडाऊन


लागले बाबा एकदाचं माझे लग्न 

गेले सगळे आता विघ्न

मी आणि माझी सुंदरा झाली

आमच्या संसारात मस्त मग्न


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy