Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umesh Dhaske

Comedy

3  

Umesh Dhaske

Comedy

लाॅकडाऊन मधील पोट

लाॅकडाऊन मधील पोट

1 min
209


लाॅकडाऊनमध्ये आमचं पोटं

मात्र डाऊन करता करता अप अप झालं

तरीही आमच्या तोंडाला मुळी लागतच नव्हतं टाळं....!😄


डेरेदार वृक्षाप्रमाणे

ढेरेदार पोट सुटलं

पोटाला पाहून आम्हालाही

खुदकन हसावसं वाटलं....!😄


आम्ही आमच्याच पोटावर हसणं म्हणजे आमच्या 

पोटाचा अपमान होता..

आमचं पोट आमच्यासाठी जणू फार मोठा सन्मान होता...!😝


काही जण तिरस्काराने 

तर काही भुवया उंचावून

काही डोळे वटारुन 

तर काही आपली दिसणारी

बत्तीशी आवळून

माझ्या निरागस आणि निर्विवाद पोटाकडे पाहत होतीत..

फासावर गेलेली बटणे सुद्धा 

'आ' वासून पडली होतीत...😄


वजनकाट्याने तर उच्चांक

गाठला होता

काटा मागे मागे सरकत थेट

पुढेच जात होता...!😄


काट्याला थांबवण्यात काही 

अर्थ नव्हता

पोटाचा घेर सर्व काही सांगत होता....!😄


पोट कमी करणं

मनावर घेतलं खरं

जीभ सारखी आमची

उडवत होती टर...!😄


खाण्यावर आमच्या आम्हीच

निर्बंध लावले

काही अंशी तरी पोटोबाला उपवास घडले....!😄


"गरम पाणी प्या"

काहीजनांनी चपराक लगावले

"धावल्याशिवाय पर्यायच नाही"

काहीजणांनी ढोल बडवले.😄


"उकडलेलंच खाणं योग्य आता"

हळदीकुंकूवात विषय झाला

"सायकलवरुन चालत जा"

कुणाचातरी सल्ला जिव्हारी लागला....!😝


"उठाबशा काढायला हरकत नाही काही"

काही शहाण्यांचे मार्गदर्शन मिळाले.

"भात खाणं आधी बंद करा"

काहीनी मध्येच आपले नाक खुपसले...!😡


आमच्या पोटावर ह्यांनी 

विनाकारण का सल्ले द्यावे

शेजार्‍यापाजार्‍यांचे बोलणे 

आम्ही उगाच का खावे ?😄


मीटर पट्टी पोटाला गुंडाळून

पोट मापून पाहिले

पहिल्यापेक्षा जास्त मीटरपट्टीने

आकडे धाडले....!😄


धावणे,पळणे,चालणे

एका दमातच झाले

पोटावरच्या योगासनाने

श्वासच गायब झाले....!😄


उपचार सगळे 

इकडून तिकडून

उलटे सुलटे केले..

पोटाच्या ह्या उपचारांनी

मला अर्धेनिम्मे केले....😄


चमचमीत पदार्थांवर आमचा डोळा होता

काय सांगायचं राव तुम्हाला !

आमच्या सौंचा आमच्या पोटावर डोळा होता...!😄


अक्षरशः दोन महिने

पुरते घायाळ केले

गोड,तिखट ,खमंग आता

आमच्या स्वप्नात येऊ लागले...!😄


ढेरीवरची आपली मालकी

सोडतो काय मी आता😝

सोडून दिलं सगळं आम्ही

मारु दे लोकांना बाता....!


हवं ते करणार,हवं ते खाणार

पर्वा आता करत नाही

डायटींगचा विचारही आता 

माझ्या मनी फिरकत नाही.

डाएटींगचा विचारही आता

माझ्या मनी फिरकत नाही....!😄


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy