STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Drama Tragedy

3  

Gaurav Daware

Comedy Drama Tragedy

सुपरमॅन अवतारी...

सुपरमॅन अवतारी...

1 min
185

आमच्या गावचे गणपतराव होते लय भारी

सुपरमॅन बनण्यासाठी त्यांनी केली पूर्व तयारी

गळ्यात बांधून एक कापड थोडे कपडे अलवारी

एक मोठी चड्डी घालून ते दुपारी गावगाव फिरी


कधी चढे झाडावर तर कधी बने चक्रधारी

कधी भाजीवाल्याले चोर ठरवून करे मारामारी 

कधी थोडे अल्लड तर कधी बने मतबारी

कधी एकटेच दोरी बांधून लटके झाडावर सारी 


ते होते साधे अन थोडे अलगत अलवारी

सुपरमॅन पिक्चर पाहल्यापासून बनले अविष्कारी

रोज नवीन प्रयोग करून ते बने कलाकारी

आपली कला दाखवत गावभर फिरे भिरभीरी


पण एकदा घडला एक कमाल भारी

जोश जोश मध्ये चढले ते झाडावरी

गावकरी त्याचा हा कमाल बघत होते सारी

लहान पोर वाजवे टाळ्या बनून साक्षीदारी 


पण तेव्हड्यातच घडली एक गोष्ट चमत्कारी

झाडावरुन उतरताना पंचायत झाली सारी 

चड्डी फाटून भक्कन गेली सगळी इझ्झत वारी वारी 

टरकन आवाज होताच सगळे पाहत राहिले अलवारी


कोणाला वाटे त्यांच बहुतेक पोट झालं असेल भारी

तर कोणी म्हणे त्याना नसेल पचलं दुपारचं जेवण थोडतरी

कोणी म्हणे त्यांना झाली असेल ऍसिडिटी अलवारी

तर कोणी म्हणे त्याची चड्डी उसवली असेल भारी


हे सगळं एकूण गणपतरावाणा वाटे लाज सारी

चड्डी फाटली म्हणून गळ्यातल्या कापडाची बनवली लुंगी मस्त भारी

कंबरेला बांधून ती लुंगी निघाले ते घराकडे तुरतुरी

आणि तेव्हापासून सोडल बनणं त्यांनी सुपरमॅन अवतारी

तेव्हापासून सोडल बनणं सुपरमॅन अवतारी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy