STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

3  

Varsha Chopdar

Inspirational

उत्तर अजून मिळाले नाही

उत्तर अजून मिळाले नाही

1 min
817




कोणीतरी मला सांगा

कोडे हे उलगडले नाही

कोंबडी आधी की अंडे आधी

उत्तर अजून मिळाले नाही -----


कोणीतरी मला सांगा

माणूस समाधानी होतच नाही

सुख म्हणजे काय असतं ?

उत्तर अजून मिळाले नाही ------


कोणीतरी मला सांगा

' मी ' पणा कधी संपत नाही

आहे ' मी ' कोण ?

उत्तर अजून मिळाले नाही -------


कोणीतरी मला सांगा

प्रश्न कधीच संपणार नाही

समाधान काय ?

उत्तर अजून मिळाले नाही ------


अशक्य असे काही नाही

शोधले की सापडते

केल्यास प्रयत्न योग्य दिशेने

काहीतरी नवे गवसते -------


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational