उत्कर्षाचे सोहळे
उत्कर्षाचे सोहळे
पहाट होता अंगणी
फुलाला मोगरा
श्रावण बरसवुनी
सुगणधात न्हाली वसुंधरा
झुंजूमुंज झालं
नभात आला रवी उदया
अमृत वाहूनी नेती
उधाण सागराला नद्या
शतकीरणांनी खुलल्या वाटा
झाले यशाचे मार्ग मोकळे
नवचैतन्याने करू
साजरे उत्कर्षाचे सोहळे