तू दवबिंदू सखे...
तू दवबिंदू सखे...
हिरव्या तृणावरचा तू तो दवबिंदू सखे ,
मोत्यासारखा चमकते तो दवबिंदू सखे
सहस्त्र विजा हृदयावर तुला पाहता ,
चंद्र लपतो कमळपर्णी तो दवबिंदू सखे ...
सौंदर्याचा अर्थ वाहणारा झरा तू ,
ओंजळीत तृप्त करते तो दवबिंदू सखे ...
दोन डोळ्यांची कैफियत काय ? सांगू तुला ,
हुरहुरणारे काळीज तहान तो दवबिंदू सखे ...
खरं सांगतो गझल लिहिता येत नाही मला ,
लिहिण्यास भाग पाडते तो दवबिंदू सखे ...
लपतो कधी पाण्यात कधी त्या पावसात ,
अदृश्य तरी सुड माझाच तो दवबिंदू सखे ...
हिरव्या तृणावरचा तू तो दवबिंदू सखे ,
मोत्यासारखा चमकते तो दवबिंदू सखे
