STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Abstract Inspirational Others

3  

सुमनांजली बनसोडे

Abstract Inspirational Others

तू बघ माझ्या नजरेतून

तू बघ माझ्या नजरेतून

1 min
186

तू येणार असशील तर 

ये माझ्या जीवनात 

जर जग पहायचं असेल तर 

ते पहा माझ्या नजरेत....

  

   जर ठेवणार असशील अपेक्षा

      सुख समृद्धी मिळवण्याची 

      तर मात्र माझा नकार आहे 

  कारण मला सवय आहे चळवळीची....


त्यासाठी तुला पहावं लागेल 

माझ्या नजरेतुन ह्या जगाला 

मग ते खैरलांजी असो की भिमाकोरेगाव 

अगदी खंबिरपणे प्रत्येक क्षणागणिक 

तुला द्यावी लागेल साथ लढायला...


      माझं जीवन म्हणजे 

      जिजाऊंची धारदार तलवार 

      सावित्रीमाईंची झुंजार लेखणी...

      अन्यायाविरुद्ध लढणारी एक वावटळ आहे

      आणि म्हणुनच लढतांना 

      कदाचित मी संपेन, तेव्हा मात्र तुला 

      माझ्या नजरेतून जग पहायचयं...


हा लढा अविरत चालू ठेवण्यासाठी 

या बाबासाहेबांच्या पावनभूमीत 

निळं निशाण फडकविण्यासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract