STORYMIRROR

Umesh Dhaske

Drama

3  

Umesh Dhaske

Drama

तुरपाई...!

तुरपाई...!

1 min
220

उसवली ठिगळं आज

उसवली घडी

फाटक्या धडूताला होती

माझी तुरपाई......!


एक एक धागा 

जोडीयेला सुईनं

वीण नाजूक साजूक

इनली मायेनं

लडिवाळ जीनं तुझं

नुसतीच घाई.....

फाटक्या धडूताला होती

माझी तुरपाई.......!


हात झाले जणू माझं

शिलाईचे चाक

मांडीवर सदर्‍याला

गोंजारीते आज.....

दुमडून सावरली रं

लाज मी रं तुझी

फाटक्या धडूताला होती

माझी तुरपाई.......!


उसवण ती 

जाळी काळजाला 

सुया टोचल्या किती रं

माझ्या मनाला......

दोरा जोडी कापडाला

उसवण ठायी ठायी

फाटक्या धडूताला होती

माझी तुरपाई........!


हिंदोळ्यात आठवणींच्या

आठवण झाली

जोडलेली नाती सारी

ओलिचिंब झाली.......

देवळीत जपलाय डबा

सुई दोर्‍याचा गं बाई

फाटक्या धडूताला होती

माझी तुरपाई.......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama