STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Inspirational

4  

Aniket Kirtiwar

Inspirational

तुम्हा कसे

तुम्हा कसे

1 min
12K


तुम्हा कसे कळते मुक्या पाखरांनो

सांज झाली निघावे घराला

ईथे माणसे तर भटकली केव्हाची

परतलीच नाही अजुनही घराला


एका झाडावर होती वानरे अनेक

खेळत होते त्यात पिल्लू एक

कुणाच्या खांद्यावर नाचत होते

कुणाच्या मांडीवर लोळत होते

कळेना मला हे मुल कुणाचे

म्हणाले मला हे मुल वानराचे


जिथे ईतकी माया मिळे वानराला

तिचे वंश आपण का गेलो लयाला

तुम्हा कसे कळते ...


गोठ्यात हंबरत होती वासरे

वळु वळु पाहे होता भास रे

डोळ्यातून अश्रू गाळीत होते

फास दोरांचा आवळीत होते

विचारले तुम्हा भुक लागली का?

म्हणे आमची माता तुम्हा दिसली का?


जिथे दुधासोबत माया गोडीला

भुक लागली रे तिथे ओढीला


तुम्हा कसे कळते....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational