STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Romance

3  

Aniket Kirtiwar

Romance

खरं प्रेम

खरं प्रेम

1 min
4.0K


प्रेम हे अमर्त्य आहे

संकटांना समर्थ आहे

सामंजस्याचे स्त्रोञ ठेवा

तरच त्याला अर्थ आहे


वासनेचे नको इशारे

भितीचे पण नको शहारे


प्रेम हे संसर्ग आहे

संकटांना समर्थ आहे......


मन हे एकरूप असावे

भाव ही एकरूप दिसावे


प्रेम एक संदर्भ आहे

संकटांना समर्थ आहे. ....


जे वासनेने लुप्त आहे

सर्व मिळून ही अतृप्त आहे


प्रेम त्यांचे व्यर्थ आहे

संकटांना असमर्थ आहे

कोण कधी देईल दगा

शेवट त्याचा अनर्थ आहे


प्रेम हे अमर्त्य आहे संकटांना समर्थ आहे,

सामंजस्याचे स्त्रोञ ठेवा, तरच त्याला अर्थ आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance