STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Tragedy

4  

Aniket Kirtiwar

Tragedy

प्रेमास भुकेला

प्रेमास भुकेला

1 min
327

दारात कुणाच्या रडतय गं हे गोजिरवाणं लेखरू

प्रेमास भुकेला आईच्या फडफडतयं गं पाखरू


मला जन्मुनी माझे आई

दोन दिस भी झाले नाही

तुझ्या दुधाच्या धारेने

माझे ओठ भी भिजले नाही

अग सांग कुणाच्या कुशीची छाया मनावर मी पांघरू

प्रेमास भुकेल्या.......


मला वाटते माझे आई

मी रांगत रांगत जावं

अन् वळून तुझ्या कुशीत गं

मी धावत धावत यावं

अवघडलो जर का वाटेत तर मी बोट कुणाचे धरू, प्रेमास भुकेल्या.......


प्रेमाच्या भुकेला रे राजा

पोटाची आग विझवते

तु रडतोस आपुल्या दारी

माझ मन ही तिकडे रडते

सांज होईल तेव्हा राजा मी परतेल नको हे विसरू, प्रेमास भुकेल्या.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy