STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Others

4  

Aniket Kirtiwar

Others

निरखून बघ ना..

निरखून बघ ना..

1 min
5.3K


कधीतरी तु मला निरखून बघ ना

कुणी आड येणार नाही इतक्या जवळून बघ ना

कधीतरी तु मला निरखून बघ ना....


मला ठाऊक आहे कां तुझे नजर उठत नाही

थरथरणारे तुझे कां ओठ बोलत नाही

जातीच्या डोहामध्ये जे पुसले युगायुगाहुन

प्रेमाच्या सागराशी मैत्री करत नाही


खांद्यावरून जोखडाला झुगारून फेक ना

कधीतरी तु मला निरखून बघ ना


वय तुझे, वय माझे मोजू नको वर्षाने

कळी यौवनात येते सूर्याच्या स्पर्शाने

तु जगली मी जगलो नाही जरी इथे

प्रेम तुझे अण् माझे जगू दे हर्षाने

मनाला एकदा सांगून बघ ना


कधीतरी तु मला निरखून बघ ना

कुणी आड येणार नाही इतक्या जवळून बघ ना.....


Rate this content
Log in