STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Tragedy

3  

Aniket Kirtiwar

Tragedy

ह्या मोडक्या घरात

ह्या मोडक्या घरात

1 min
2.4K


ह्या माझ्या मोडक्या घरात

रोजच येतात सुर्याची किरणे

आशेची मात्र येत नाही

खस्ता खाल्लेल्या माझ्या जिवाला ओळख दिशेची पटत नाही


प्रातः काळी उठू कशाला

व्यस्त मनाला कळत नाही

अनेक विचार भरले आहेत

डोक्यात माझ्या ठायी ठायी


अंधार पांघरूण झोपी जावं

दुर एका गावी जावं

जिथे कळेल व्यथा मला

तिथे होईल दुःख मला

जिथे मिळेल प्रेम मला

तिथे होइल हर्ष मला


कारण तिथे राजा असेल मीच

आणि तिथली प्रजा ही मीच

राजा पुसतील प्रजेचं व्रण

प्रजेला कळतील राजाच मन


मग नसतील मनात विचार

साधाभोळा असेल व्यवहार

मग होइल मन मोकळं

डोळे झाकून दिसेल सगळं

दारी येतील सुर्याची किरणे

सुर्या भोवती आशेची तोरणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy