STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Drama

3  

Aniket Kirtiwar

Drama

का गं चिऊताई

का गं चिऊताई

1 min
2.9K


का गं चिऊताई येतेस कां?

बाळाशी माझ्या खेळायला

तु असते जवळ त्याच्या

वेळच नसतो रडायला


याचे बाबा जातात ऑफिसला

अन् ताई जाते शाळेला

मी एकटीच असते घरी

बाई उसंत मिळेना कामाला


ताई आली शाळेवरून की

अभ्यास करते डोळे मिटून

मी म्हटले "जरा घे गं याला"

तर संधीच मिळते झोपायला


बाबा आले ऑफिस वरून तर

थकून बसतात डोके धरून

मी म्हटलं "जरा घ्या हो याला"

तर लगेच लागतात चिडायला


का गं चिऊताई........


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama