STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy

3  

Supriya Devkar

Tragedy

तुझं जाणं

तुझं जाणं

1 min
11.9K

तुझ्या जान्याने सारे निशब्द होऊन गेले

अचानक आकाशात नभही दाटून आले  

नाही मानवल तुझं अस अवचित जाणं 

कस जमेल तुझ्या विना एकट राहणं 

तुझी सवय जडलेली मोडावी कशी

तुझ्या विचारांची फळी तोडावी कशी 

तुझ असण आमच्या श्वासात बसलं आहे 

तुझ्या नसण्याच सरन आम्ही आता रचल आहे  

तुझं नसणं देईल एकटेपणाला आमंत्रणं 

तुझ्या विचारांनी सोडवेन उरलेली समिकरणं

आठवेन तुला मी प्रत्येक क्षणाला 

देईन उभारी मी माझ्या मनाला

आता रडून चालणार नाही 

मागे बघून जमणार नाही 

आयुष्य खूप सुंदर आहे 

एकट्याने पूढे जाणार आहे 

आता रथाचा सारथी बनणार आहे 

मदार एकट्याने सांभाळणार आहे

मायेची पाखरण करेन भरपूर 

पाखरांना आधार देईन पुरेपूर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy