STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Children

2  

Dattatraygir Gosavi

Children

टपाल

टपाल

1 min
78

आल टपाल कुणाच

काकाच माझ्या मामाच

आत्याच की माझ्या मामीच

का माझ्या प्रिय बाबाच ।।धृ।।


आई असते गावाला

बाबा बाहेर कामाला ।

मामा बोलावती मला

गोड आंबे ते खायाला।

वर्णावी गोडी आंब्याची

चव जिभेवर त्याची।।१।।


आत्या शिकविते मला

समाज जीवन कला।

रीत भात जगण्याला

चाली रीती अगत्याला।

कसं वागावं नात्याच

नात समाज कण्याच।।२।।


आबा आजीचा निराळा

ढंग  प्रितीचा आगळा ।

नातू उठ बस पाट

मोक्षपट शिडी थाट।।

उदो उदो नातवाचा

राजा वजीर खेळाचा।।३।।


नाती गोती ही जोडली

जोडलेली टिकविली।

टपाल टपाल गोडी

तुम्ही टिकवाच थोडी।

काका काकूच्या स्नेहाचा

कोकरू जणु मी त्यांचा।।४।।


पत्र खुशाली कळवा

रोज केशवा माधवा।

पत्र खुशाल ते वाचा

असो मित्र अहो चाचा।

बहिणच की भावाच

माझ्या प्रिय भावजीच।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children